पैठण पोलिसांनी शेकडो वाहनांना बसवले रिफ्लेक्टर

Foto
पैठण, (प्रतिनिधी) सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू असल्याने पैठण शहागड, पैठण पाचोड, पैठण शेवगाव, पैठण संभाजीनगर रस्त्यावरून शेकडो उसाचे ट्रॅक्टर ट्रक बैलगाड्या यांची वाहतूक सुरू आहे.
परंतु यापैकी अनेक बैलगाड्यांना, वाहनांना, ट्रॅक्टरना, ट्रकला रिफ्लेक्टर नसल्याने अनेक ठिकाणी अपघात होऊन अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 या संदर्भात २९ डिसेंबर रोजी दैनिक सांजवार्ता मध्ये लाईट नसलेले ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर धावत आहेत. रस्त्यावर नागरिकांच्या जीवाला धोका या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध होताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी बातमीची दखल घेऊन पैठण शहागड, पैठण संभाजीनगर पैठण पाचोड रोडवर उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांना थांबून पोलिसांनी रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेऊन जवळपास शंभरच्या आसपास वाहनांना रिफ्लेक्टर लावले आहे. 

रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम उपनिरीक्षक सारंग यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे हेड कॉन्स्टेबल श्रीराम चेडे, भाऊसाहेब तांबे, दिनेश लांडगे यांनी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यासाठी परिश्रम घेतले.